Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 2 हजार 386 रुग्णांची नोंद; 4 हजार 92 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 386 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. त्यामुळे किंचित्सा दिलासा मिळाला. तर, कोरोनामुक्त झालेल्या 4 हजार 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 551 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 39 हजार 947 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 26 हजार 871 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 26 हजार 340 रुग्ण गृहविलगीकरणात असून 531 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 44 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 859 आहेत. आज दिवसभरात 276 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 49 हजार 774 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.