Maval Corona Update : मावळात 57 नवे रुग्ण; 63 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली असून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.1) 57 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 440  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 827  आहे. शहरी भागात 35 तर ग्रामीण भागात 22 रुग्ण सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 29  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 1  रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5  रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,077  झाली आहे. तर दिवसभरात 63  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात दारुंब्रे 4, ओझर्डे 3, शिवणे, कुसगाव बुद्रुक, कुरवंडे व करूंज प्रत्येकी 2, अजीवली, सांगावडे, शिरगाव, मळवंडी ठुले, कडधे, चांदखेड व कान्हे प्रत्येकी 1 असे एकूण 22  रुग्ण सापडले.

20,810 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7149, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3837 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1142 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,128 रुग्ण तर ग्रामीण भागात 9,949 रुग्ण आढळून आले आहेत.  2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.26 टक्के आहे तर मृत्यू दर 1.19  टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 184  लोणावळा नगरपरिषदमध्ये 116 वडगाव नगरपंचायतमध्ये 42  व ग्रामीण भागात 485 असे एकूण827 रुग्ण आहेत,  अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.