Maval Corona Update : मावळात रुग्ण संख्या घटतेय ; आज 87 नवे रुग्ण, 91 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील रुग्ण संख्या घटू लागली असून रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. मावळ तालुक्यात शनिवारी (दि.29) 87 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही आतापर्यंत 438 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1828 आहे.

शहरी भागात 17 तर ग्रामीण भागात 70 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 21,843 झाली आहे. तर दिवसभरात 91 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात देवले व कुरवंडे प्रत्येकी 09, सोमाटणे 07, तळेगाव दाभाडे ग्रामीण 06, साळुंब्रे व धामणे प्रत्येकी 05, आंबी, आंबळे, इंदोरी व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 03, डोंगरगाव, केवरे व माऊ प्रत्येकी 02, माळवाडी, नवलाख उंब्रे, कुणे नामा, औंढे खुर्द, शिंदगाव, भोयरे, वडेश्वर, फळणे, जांबवडे, वराळे व तुंग प्रत्येकी 01 असे एकूण 70 रुग्ण सापडले.

19578 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7079, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3807 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1126 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 12,012 रुग्ण तर ग्रामीण भागात 9,831 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.63 टक्के आहे तर मृत्यू दर 2.01 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 778 लोणावळा नगरपरिषदमध्ये 146 वडगाव नगरपंचायतमध्ये 77 व ग्रामीण भागात 827 असे एकूण 1828 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.