Maval Corona Update : आज दिवसभरात 145 नव्या रुग्णांची भर तर 85 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.25) 145 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्या वाढली आहे आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आतापर्यंत 254 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 1448 आहे.

शहरी भागात 81 तर ग्रामीण भागात 64 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 36 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 40 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 12,439 झाली आहे. तर दिवसभरात 85 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 11, उर्से 8, आंबी 5, सोमाटणे 5, तळेगाव दाभाडे ग्रामीण 5, वराळे 5, गहूंजे 4, कान्हे 3, पाचाणे 3, साळुंब्रे 2, परंदवडी 2, आढले खुर्द 2, बेबडओव्हळ, इंदोरी, नायगाव, नवलाख उंब्रे, पिंपळखुटे, पुसाणे, माळवाडी, निगडे, ओव्हळे प्रत्येकी 1 असे एकूण 64 रुग्ण सापडले.

10737 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3894, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2444 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 756 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 7094 रुग्ण तर ग्रामीण भागात 5345 रुग्ण आढळून आले आहेत. 6 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.32 टक्के आहे तर मृत्यू दर 2.04 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 327, लोणावळा नगरपरिषद मध्ये 364, वडगाव नगरपंचायत मध्ये 61 व ग्रामीण भागात 696 असे एकूण 1448 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.