Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 30 नवीन रुग्ण; 15 जणांना डिस्चार्ज

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 20 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 28) कोरोनाचे 30 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 884 झाली आहे. तर दिवसभरात 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 20 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, ओझर्डे येथील प्रत्येकी दोन, वराळे, इंदुरी, सुदुंबरे, सावंतवाडी, काले, महागाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 20 रुग्ण आढळले आहेत. तर लोणावळा आणि वडगावमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 884 रुग्णांमध्ये सध्या 428 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 380 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 649, लोणावळा नगरपरिषद 216 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 124 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 895 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.