Maval Dahihandi : लालबागच्या गोविंदांनी फोडली सह्याद्री फाउंडेशनची दहीहंडी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ (Maval Dahihandi) येथील सह्याद्री फाऊंडेशन व नगरसेवक सुनील ढोरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली दहीहंडी काळाचौकी, लालबाग येथील गोविंदा पथकाने 7 थर लावून फोडली. दहीहंडीसाठी 4 लाख 44 हजार 444 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यावेळी पाच महिला पथकांनीही सलामी दिली.
या सोहळ्यानिमित्त सुवर्णपदक विजेती हर्षदा गरुड हिला माजी नगरसेवक सुनील ढोरे यांच्यावतीने 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, राष्ट्रीय खेळाडू चिराग वाघवले व रुचिका ढोरे यांचाही सन्मान करण्यात आला.
Maval Dahihandi

यावेळी आमदार सुनील शेळके, मावळ (Maval Dahihandi) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा  भेगडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशिद, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे,नगराध्यक्ष मयुर ढोरे, संजय बावीसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, अमोल शेटे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेविका शारदा ढोरे, माया चव्हाण, पुनम जाधव, सायली म्हाळसकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा दिपाली गराडे, नगरसेवक दिनेश ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर आदींसह मोठया संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते. उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष भूषण (विकी) ढोरे व सर्व संचालक मंडळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.