Ravet Crime : भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीची पतीला व मुलांना मारहाण

एमपीसी न्यूज – रो हाऊस विकून (Ravet Crime) त्याचे पैसे मला आणून द्या, म्हणत पत्नीने घरातील भाजी कापण्याच्या चाकुने पतीला व दोन मुलांना मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार रावेत येथे शुक्रवारी (दि.19) सायंकाळी चारच्या सुमारास घडला.

यावरून सचिन प्रविण दुसाने (वय. 52 रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : ओळखीच्या व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीने निगडी येथील रो हाऊस विकून मला पैसे आणून द्या, म्हणत पत्नीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. यावेळी फिर्यादीचा मुलगा मध्ये आला असता त्यालाही चाकूने मारून जखमी केले. तर, दुसऱ्या मुलाला हाताने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा (Ravet Crime) दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.