CM Eknath Shinde : दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवारी (दि. 20 ऑगस्ट ) भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले असतानाच त्यांनी शिवसेनेचे खेडचे प्रथम आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या घरी रात्री बाराच्या सुमारास सदिच्छा भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली.

स्वर्गीय आमदार गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय आमदार गोरे यांची अखेरची इच्छा असलेल्या खेड पंचायत समितीच्या इमारतीचा राष्ट्रवादीच्या विरोधाच्या भूमिकेमुळे प्रलंबित असलेला विषय छेडला. खेडचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार यांची संबंधित इमारतीसाठी विरोधाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवत आपण स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांना अभिप्रेत असलेला निर्णय घेऊ असे आश्वस्थ केले. त्याच प्रमाणे विधानसभेच्या सभागृहात तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत गोरे कुटुंबियांच्या समवेत अन्य कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही.

Manish Sisodia : सीबीआयकडून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लुकआउट नोटीस???

यावेळी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे (CM Eknath Shinde) अध्यक्ष नितीन गोरे, मनीषा सुरेश गोरे, दत्तात्रेय गोरे, विकास गोरे, राहुल गोरे, माणिक गोरे, उमेश गोरे, निलेश गोरे यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंबीय आणि स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे चाकण पंचक्रोशीतील तमाम कार्यकर्ते त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर वेगवेगळ्या तर्कवितर्क यांचे पेव फुटलेले असताना, सदरची मुख्यमंत्र्यांची भेट अराजकीय असल्याचे स्पष्टीकरण या भेटीनंतर गोरे कुटुंबीयांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.