Hinjawadi : ओळखीच्या व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज –  तू मला आवडतेस म्हणत ओळखीच्याच व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला आहे. हा प्रकार हिंजवडी (Hinjawadi) येथे शनिवारी (दि.20) सकाळी घडला आहे.

याप्रकरणी संदिप बाळू कांबळे (वय 35 रा. तुळापूर) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhosri : पोलीस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी याने फिर्यादीला फोन करून भेटायला बोलावले. फिर्यादी गेल्या असता त्याने आपली ओळख आहे, तू माला आवडतेस मग तू माझ्याशी का बोलत नाहीस अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादी यांनी बोलण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादीचा हात धरून गैरवर्तन केले. यावरून हिंजवडी पोलीसांनी आरोपीला अटक (Hinjawadi) केले असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.