Bhosri : पोलीस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला पोलीस असल्याचे (Bhosri) सांगत तीन अज्ञात इसमांनी व्यावसायिकाला गाडीतून अपहरण केले व पैशांची मागणी करत मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि.18) रात्री साडे आठच्या सुमारास नाशिक –पुणे रोडलगत, भोसरी येथे घडला.

याप्रकरणी नितीन शंकर धिमधिमे (वय 41 रा. आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : कंपनीच्या गोडाऊनमध्ये रोबोटिक्स आणि अटोमेशेनचे अकरा लाखांचे साहित्य चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी भोसरी (Bhosri) पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव आहे. मला तुझे घर बघायचे, गाडीत बस असे सांगून फिर्यादीला जबरदस्तीने (एम एच14 जे.ए.71 08) गाडीत बसवले. गाडीमध्ये दोन आणखी इसम बसले होते. दोघे साधारण तीस वर्षांचे होते. ते दोघेही पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करत पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मारहाण करत फिर्यादीचे अपहरण केले. औंध येथील परिहार चौकात सोडून निघून गेले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.