Maval : चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांच्या ( Maval ) माध्यमातून आदिम सेवा अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत चांदखेड चंदनवाडी येथील 54 ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे रविवारी (दि. 14) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी उपसरपंच मनोज येवले,राकेश घारे, चांदखेड सरपंच मिना माळी, उपसरपंच सागर गायकवाड, सदस्य प्रमोद गायकवाड, दादा केदारी,रुपाली गायकवाड, पुजा कदम,उर्मिला गावडे,वैशाली गायकवाड, संजय गायकवाड, गोरख हिंगे,मधुकर जाधव,राजू गावडे, रोहिदास जाधव, संदीप गावडे व आजी-माजी सरपंच,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले, “ठाकर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.माझ्या ठाकर बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला याचे समाधान आहे.शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहील.”

Chinchwad : ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे पाचवे पर्व 8 फेब्रुवारीपासून

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही ठाकर समाजातील अनेक नागरिकांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत.शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.परंतु शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो.महत्वाची कागदपत्रे नसल्याने अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते.आजपर्यंत विविध शिबिरे घेऊन योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात.परंतु महत्त्वाचे जात प्रमाणपत्र कोणीही मिळवून देत नव्हते.त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.

परंतु आमदार सुनिल शेळके यांनी आदिम सेवा अभियान प्रभावीपणे राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत.अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड ( Maval ) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.