Maval : पिंपळोली गावात आढळला इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर

एमपीसी न्यूज – पिंपळोली गावात (Maval) जनावरांच्या गोठ्याजवळ इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला. या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पकडून वन विभागाच्या सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि. 8) पिंपळोली गावातील शेतकरी पांडुरंग बोंबले हे जनावरांना चरण्यासाठी सोडून शेतात गेले. त्यावेळी त्यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ एक साप असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद काली केदारी, अविनाश केदारी यांना फोनवरून माहिती दिली.

Pune : अनाम प्रेम परिवाराच्या दिवाळी फराळाने सीमेवरील सैनिकांनी साजरी केली दिवाळी

केदारी बंधूंनी बोंबले यांच्या गोठ्याजवळ जाऊन पाहणी केली असता गोठ्याजवळ झुडुपात इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला. त्यांनी वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांना माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या सूचनेनुसार त्या अजगराला पकडण्यात आले.

वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती देऊन (Maval) त्या अजगरास रिस्क्यू केले. अजगराची प्राथमिक तपासणी करून अनिल आंद्रे, काली केदारी, दक्ष काटकर, अविनाश केदारी, संतोष दहिभाते, लोकेश धुमाळ, जागर सोळंकी यांनी वन विभागाने ठरवून दिलेल्या नैसर्गिक अधिवासात अजगराला सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.