Maval: शिळाटणेच्या उपसरपंचपदी कांचन भानुसघरे बिनविरोध

Maval: Kanchan Bhanusghare elected unopposed as Deputy Sarpanch of Shilatane

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिळाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांचन शरद भानुसघरे यांची बिनविरोध निवड झाली. 

या आधीच्या उपसरपंच निर्मला भानुसघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसेवक रूपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.

निर्धारित वेळेत भानुसघरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली जाधव यांनी कांचन भानुसघरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

 प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य  माधुरी भानुसघरे ,शरद आहिरे, निर्मला भानुसघरे, मनिषा भानुसघरे, सोनल येवले,पोलीस पाटील ज्ञानदेव भानुसघरे, भाजपाचे प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे,माजी उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, माजी सरपंच हेमंत भानुसघरे,राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष तानाजी भानुसघरे, संभाजी भानुसघरे, अनिल भानुसघरे, अरुण भानुसघरे, शांताराम भानुसघरे, संतोष भानुसघरे, रामदास भानुसघरे, साईनाथ भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, दत्तात्रय भानुसघरे, बाळासाहेब आहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्याकडून  कांचन भानुसघरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.