Talegaon Dabhade : आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रौप्य महोत्सवाचे (Talegaon Dabhade) औचित्य साधून जैन इंग्लिश स्कूल येथे मावळ तालुक्यातील सर्व शाळांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन शुक्रवारी (दि.9) संपन्न झाले. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शाळेचे संचालक सदस्य किरण परळीकर, दिलीप पारेख, दिलीप वाडेकर, राकेश ओसवाल, मुख्याध्यापिका अपूर्वा टकले, शुभांगी भोईर तसेच मावळ तालुक्यातील सर्व सहभागी शाळांचे शिक्षक, बहुसंख्या पालक कार्यक्रमास उपस्थित होते.

याप्रसंगी मेगा सायन्स एक्झिबिशनचे उद्घाटक प्रमुख अतिथी डॉ राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या ओघवत्या भाषेत विज्ञानाची ओळख सांगताना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांशी बोलताना केले.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे

संस्थेचे अध्यक्ष डॉ दीपक शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना आवाहन केले की येणारा भविष्यकाळ फक्त विज्ञानाचाच असेल त्याप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन  (Talegaon Dabhade) चौकस बुद्धी जिज्ञासू वृत्ती वाढवून क्षणाक्षणाला होणारे वैज्ञानिक परिवर्तन स्वीकारून आपल्या देशाची प्रगती केली तरच खऱ्या अर्थाने विज्ञानाचा लाभ घेता येईल यासाठी आजच्या पिढीने जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये मावळ तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी प्रकल्पांच्या माध्यमातून आपला उत्स्फूर्त सहभाग दाखवून अतिशय नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश केल्यामुळे या विज्ञान प्रदर्शनास एक आगळे वेगळे महत्त्व निर्माण झाले होते.

या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण विज्ञान विषयात पारंगत तसेच अनुभवी असणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील अमोल सलागरे आणि रविराज कुमार यांनी केले.

शाळेची विद्यार्थिनी प्राप्ती हडवळे हिने आपल्या मनोगतातून दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी केले आणि सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापिका विजया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका तृप्ती अगरवाल,वृषाली भोंडेकर, अमृता सेलुकर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता फाकटकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.