Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे, उपाध्यक्षपदी विकास कंद, समीर भेगडे, सचिवपदी अतुल राऊत, खजिनदारपदी अमित भसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक शुक्रवारी (दि. 9) संस्थेच्या सभागृहात पार पडली.

यावेळी संस्थेचे संस्थापक सहकारभूषण बबनराव भेगडे, पीएमआरडीए सदस्य व संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे,माजी अध्यक्ष राहुल पारगे,शरद भोंगाडे,संचालक, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश आंबेकर व सर्व संचालक आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते.(दि 9) फेबुवारी 2024 रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Pimpri : क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत ‘सिंधी प्रीमिअर लीग’ पाचव्या पर्वाचे उद्घाटन

संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे

अध्यक्ष – निलेश राक्षे
उपाध्यक्ष- विकास कंद,समीर भेगडे (Talegaon Dabhade)
सचिव- अतुल राऊत
खजिनदार- अमित भसे

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव व खजिनदार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.