Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला (Chakan) आहे. हा अपघात गुरुवारी (दि.8) चाकण येथील आळंदी रोड येथे घडला आहे.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे

राजकुमार यादव (वय 24 ) असे मयत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. आजिंक्य रमेश डबले (वय.24) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड वळणाचे राजदीप लॉज जवळून राजकुमार पायी जात होते. यावेळी कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी तेथे न थांबता तेथून गेला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.