Alandi : सोळू स्फोटातील मृतांचा आकडा चारवर; भाजी घ्यायला गेलेल्या महिलेचा स्फोटात नाहक मृत्यू

एमपीसी न्यूज : आळंदी जवळ (Alandi) असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटामध्ये रामचंद्र मारुती निंबाळकर (वय 81), संतोष त्रंबक माने (दोघे रा. सोळू), नवनाथ पांचाळ (वय 55), नंदा संतोष शेळके(वय40) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

काल 81 वर्षांच्या आजोबांचा मृत्यू झाला तर आज एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. नंदा शेळके या पालेभाज्यांच्या दुकानात भाजी खरेदी करत होत्या दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाच्या ज्वाळा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. सुमारे 70 ते 80 टक्के शरीर भाजले गेले होते. पुण्यातील खासगी सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरु होते. मात्र शनिवारी (10) उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोळू ते खटाकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा ली ही कंपनी आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनी मध्ये एल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनवण्यासाठी आणलेला कच्चा माल लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची पूर्णपणे जाणीव असताना सुद्धा तो कच्चा माल धोकादायक रित्या साठवणूक करून तिची योग्य ती विल्हेवाट न लावता किंवा त्या पदार्था बाबत योग्य ती सुरक्षिकता न घेतल्यामुळे स्फोट झाला आहे. त्या स्फोटा मुळे परिसरातील घरांना तडे गेले. व नऊ दुचाकी वाहने
जळाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.