Maval : मनोज कासवा यांची भाजपा किसान मोर्चाच्या सचिवपदी निवड

एमपीसी न्यूज – भाजपा किसान मोर्चाची, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ( Maval) नुकतीच जाहीर केली. यामध्ये सचिव पदावर पुणे जिल्ह्यातून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोज मेघराज कासवा यांची निवड करण्यात आली आहे. मनोज कासवा हे मूळचे तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त ते वाकड या ठिकाणी वास्तव्यास आहेत. 

या कार्यकारिणीत एकूण आठ सरचिटणीस, 17 उपाध्यक्ष व 19 सचिव जाहिर केले असून सर्व भाजपाचे कार्यक्षम कार्यकर्ते व शेतकरी/कष्टकऱ्यांसाठी काम करणारे आहेत.
मनोज कासवा हे संघसमर्पित व्यक्तिमत्व असून भाजपाच्या कामात व प्रत्येक निवडणूकित त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ते तळेगाव दाभाडे व इंदोरी मावळ या ठिकाणी शेती करतात. पहिल्या पासून समाजकार्य व पक्षकार्याची आवड असल्याने ते राजकिय व सामाजिक जीवनात कार्यरत आहेत.  त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव ( Maval) होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.