Maval : मावळातील विद्यार्थीनी घेतले वन्य प्राण्यांविषयी धडे

एमपीसी न्यूज – वन्यजीव सप्ताह निमीत्त मावळ तालुक्यातील 2700 पेक्षा जास्त ( Maval ) विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांविषयी जाणून घेतले.या उपक्रमाचे आयोजन वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.



 वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मांतावर ,वनपाल एस एस बुचडे, पी एम रासकर , घुगे , तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव वडगांव मावळ, वानपाल ऐक के. हिरेमट, स. चुटके , ड. दोमे आणि सर्व वनरक्षक व वनमजूर उपस्थित होते. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश गराडे , अध्यक्ष अनिल अंद्रे सदस्य संतोष दहिभाते, संकेत भानुसघरे, शत्रुघ्न रसांकर,विकी दौंडकर, साहिल नायर उपस्थित होते.

Maval : मनोज कासवा यांची भाजपा किसान मोर्चाच्या सचिवपदी निवड

 दर वर्षी प्रमाणे वन्यजीव सप्तहा देशभर 1 ते 7 ऑक्टोबर साजरा केला जातो, या वर्षी पण वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने  मावळ तालुक्यात गावो गावी फिरून विद्यार्थिना मध्ये केली जनजागृती केली.

 या वेळीस वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल आंद्रे सदस्य जिगर सोलंकी यांनी मुलांना मावळ तालुक्यातील आढळणारे वन्यप्राणी आणि त्यांचे महत्व, तसचे मानवी जीवनावर त्या वन्यप्राणी चे प्रभाव कसे आहे ते विद्यार्थिना समजून दिले.

या 5 दिवसा मध्ये वनविभाग शिरोता, वनविभाग वडगांव व वन्यजीव रक्षक मावळ संस्था 15 गावांन मध्ये जाऊन जनजागृति केली त्यात कुने नामा, देवघर, उक्सान, गोवीत्री, साई, नानोली, नवलाख उंब्रे, निगडे, मळवली, कडधे, शिवणे, आढळे ख., वडगाव मावळ, भोयरे, इंगळूण इत्यादी गावांमध्ये जाऊन जागृती केली.

जखमी प्राण्यांनाही दिले जीवदान

वन्यजीव सप्ताह दरम्यान काही जखमी प्राणी जसे सांबर व 11 बगळे उपचारा साठी पाठवण्यात आले व काही प्राणी जसे की साप, कासव, पक्षी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.

तसेच कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अढळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे (9822555004) आणि अधक्ष्य अनिल आंद्रे यांनी लोकांना केले ( Maval ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.