Maval News : बाळासाहेब नेवाळे यांचे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालकपद धोक्यात!

0

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब शंकर नेवाळे संघाच्या संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांचे संचालकपद धोक्यात आले आहे.

नेवाळे यांचे संचालक पद रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.३) दूध संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांनी दाखल केला. विभागीय उपनिबंधकाच्या सुनावणीनंतर त्यांचे पद रद्द होणार नेवाळे यांच्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद होते. आता कात्रज दूध संघाचे संचालक पद धोक्यात आल्याने मावळ तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पुणेचे विभागीय उपनिबंधक सुनिल शिरापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीत बोगस मतदारांची नावे तसेच बोगस ठराव केल्याप्रकरणी (दि.22 फेब्रुवारी 2021) ला संचालक बाळासाहेब नेवाळे यांना पोलिसांनी अटक केली. सद्यस्थिती ते येरवडा (पुणे) कारागृहात अटक आहेत. कात्रज दूध संघाच्या (दि.23 फेब्रुवारी 2021), (दि.26 मार्च 2021) व (दि.28 एप्रिल 2021) या बैठकीला नेवाळे गैरहजर होते. दूध संघाच्या कायदेशीर तरतुदीनुसार तीन बैठकीला संचालक गैरहजर असल्यास त्यांचे पद अपोआप रद्द होते.

नेवाळे यांनी (दि.28 एप्रिल 2021) रोजी तिसऱ्या बैठकीच्या वेळी येरवडा कारागृहातून पत्रव्यवहार केला. पण त्या पत्रावर येरवडा पुणे कारागृह अधीक्षक यांची स्वाक्षरी नसल्याने त्यांच्या या पत्राला कायदेशीर महत्व राहत नाही. नेवाळे दूध संघाच्या तीन बैठकीला गैरहजर असल्याने त्यांचे संचालक पद कायदेशीर तरतुदीनुसार रद्द होत असल्या बाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित कात्रज पुणे चेअरमन विष्णु हिंगे यांनी सोमवारी (दि.3) प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पुणे विभागाला दिला आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होवून संचालक पद रद्द होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment