Maval News: वडगाव येथे मावळ तालुका भाजप कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीपूर्वक साजरा करण्यात आला. मावळ तालुका भाजपाच्या वतीने वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पुणे पदवीधर नोंदणी प्रमुख व भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र अप्पा भेगडे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असल्यामुळे मागील काही महिने लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरी राहणे पसंत केले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून नागरिकांचे रक्तदान करण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासत आहे. याच सामाजिक जाणिवेचे भान ठेवून मावळ तालुका भाजपा ओबीसी आघाडीच्या वतीने साळुंब्रे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मावळ तालुका भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र विधाटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात तरुण वर्गाने हिरीरीने सहभाग घेतला.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनिल चव्हाण, शामराव राक्षे, विकास लिंभोरे, नामदेव वारींगे, रमेश येवले, सरपंच उज्ज्वला आगळे, दिलीप विधाटे, संतोष राक्षे, नंदकुमार आगळे, बाळासाहेब विधाटे, गोटीराम कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.