Pune News: 94 वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

Pune News: 94-year-old grandfather defeats Corona उपचारांती बरे झालेले आजोबा हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाचे वडील आहेत.

एमपीसी न्यूज – पुण्यातील सशस्त्र दलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये 94 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपचारांती बरे झालेले आजोबा हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाचे वडील आहेत. वेळेवर केलेल्या उपाययोजना व योग्य सावधगिरी बाळगल्यामुळे, नागरी भागांच्या तुलनेत संरक्षण संस्था व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी असल्याचे दिसून आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.