Maval News : मावळ तालुक्यात 5 ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी सुरु

एमपीसी न्यूज – राज्यभरात बुधवार (दि. 14) पासून लॉकडाऊन सुरु झाला, त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मावळ तालुक्यात 5 ठिकाणी गुरुवार (दि. 15) पासून (दि. 1 मे) पर्यंत मोफत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

लॉकडाऊन काळात गरीब – गरजूंना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मावळ तालुक्यात हाॅटेल मोरया वडगाव येथे 75 थाळी, सप्तश्रृंगी महिला औद्योगिक सह संस्था तळेगाव दाभाडे येथे 125 थाळी, सहयोगी स्वंयम सहाय्य महिला बचतगट कामशेत येथे 100 थाळी, हाॅटेल दुर्गा पवनानगर येथे 100 थाळी, स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर लोणावळा येथे 150 थाळी आदी ठिकाणी मोफत शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या मोफत शिवभोजन केंद्रावर गरीब – गरजू व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके व मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

फक्त कान्हे येथील हॉटेल हिंदवी येथील शिवभोजन केंद्र बंद असुन त्या परिसरात शासकीय ग्रामीण रुग्णालय असुन गरीब – गरजू लोक असल्याने हे केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

वडगाव नगरपंचायत हे मावळ तालुक्याचे मुख्यालय असल्याने केवळ 75 थाळी मर्यादा असल्याने थाळीची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.