Maval News : वारकऱ्यांवरील निर्बंध शिथिल केले नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात फिरकू देणार नाही- विश्व हिंदु परिषद बजरंग दल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात वारकऱ्यांवर होणाऱ्या निर्बंधाबाबतीत विश्व हिंदु परिषद बजरंग दल व अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने मावळ तहसील दारांना निवेदन देण्यात आले.

विश्व हिंदु परिषद बजरंग दल व वारकरी महामंडळाच्या माध्यमातुन महाराष्ट्रभर आंदोलन घेण्यात येत असताना त्याच प्रकारे मावळातही हे आंदोलन घेण्यात आले. पोटोबा महाराज मंदिरापासुन टाळ मृदुंगाच्या गजरात भगवी पताका सोबत घेवुन निवडक वारकऱ्यांसह बजरंगदलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत अभंगाच्या स्वरात मोर्चा नेण्यात आला. कोरोनाचे नियम पाळुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

विश्व हिंदु परिषद सहमंत्री मोरेश्वर पोपळे यांनी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या सातशे वर्षांच्या पायी वारीला खंड पडला असुन आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी वारकऱ्यांवर निर्बंध लादून वारकरी परंपरा खंडीत करण्याची भुमिका या शासनाची दिसत आहे, अशी टीका केली.

मुगल कालखंड, इंग्रज कालखंडातही वारी कधी बंद झाली नाही परंतु या नतद्रष्ट शासनाने ते करुन दाखवले त्यामळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर शासनाने आपल्या भुमिकेत बदल केला नाही तर वारकऱ्यांच्या सहकार्याने विश्व हिंदु परिषद बजरंग दल मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करेल असा इशाराच पोपळे यांनी प्रशासनाला दिला.

या वेळी अखिल वारकरी मंडळाच्या वतीने नारायण ढोरे म्हणाले वारकरी पुर्ण कोरोना नियमाचे पालन करुन जर प्रमुख पालख्या जाणार असतील तर शासनाने अशी नाकरती भुमिका घेणे योग्य नाही. नियम पाळुन वारीला परवानगी द्यावी अन्यथा शासनाच्या विरोधात घरा घरातुन वारकरी रस्त्यावर उतरुन मुख्यमंत्रांना पंढरपुरात जाऊच दिले जाणार नाही .

या ठिकाणी विभाग संयोजक संदेश भेगडे, मोरेश्वर पोपळे, महेंद्र असवले, संदिप महाराज लोहर, अमोल पगडे, गोपिचंद कचरे, बाळासाहेब खांडभोर, सचिन शेलार, दत्ता गरुड, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नारायण ढोरे, सोपानराव म्हाळसकर, अरुण पिंगळे, अनंता कुडे, पंढरीनाथ भिलारे, अरुण वारिंगे, महेंद्र म्हाळसकर, आदी वारकरी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.