Maval News : महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा

एम पीसी न्युज – वाढत्या महागाईच्या विरोधात व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागर यात्रा काढली ( Maval News) जात आहे. या ‘जनजागर यात्रेचे’ मावळ विधानसभेतील श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या शहरांमध्ये स्वागत करण्यात आले.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी श्री क्षेत्र देहू येथून यात्रेस आज प्रारंभ करण्यात आला.
वाढत्या महागाईमुळे, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.परंतु सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.यावर आवाज उठविण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर आपली भुमिका मांडुन सर्वसामान्यांना जागरुक करायचे आहे.सावित्रीच्या लेकी महागाई विरोधात,बेरोजगारी विरोधात आवाज उठवून जागर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या ( Maval News)प्रयत्नांना बळ देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. सत्ताधारी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सर्वांनीच मतं व्यक्त करायला हवीत,असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे,जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी तालुका अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे,पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती बाबुराव वायकर,वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, जि.नि.समिती ( Maval News)सदस्य विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, कार्याध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, ॲड.रुपाली दाभाडे,शितल हगवणे, पुष्पा घोजगे,संध्या थोरात,भिकाबाई वाघमारे,वर्षा नवघणे तसेच सर्व शहरांचे अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.