Maval News : मावळ तालुका भाजपच्या वतीने अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्याकडून इंदोरीतील कोविड सेंटरची पाहणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र (अप्पा) भेगडे यांनी इंदोरी येथील कोविड सेंटर तोलानी इन्स्टिट्यूट आणि समुद्र कॉलेज टाकवे खुर्द या ठिकाणी आज बुधवार (दि 28) भेट देऊन पाहणी केली आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी सरचिटणीस सुनील चव्हाण,युवा नेते देवा गायकवाड,पंचायत समिती सदस्य ज्योती शिंदे, इंदोरी शहर युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नाटक,भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे,नवनाथ पानसरे यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या दोन्ही ठिकाणी सेवा बजावत असणारे डॉ. मिलिंद सोनवणे, तोलानी सेंटरच्या डॉ. पानसरे व नर्सेस यांच्याशी संवाद साधला. त्यांना असलेल्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.

या दोन्ही ठिकाणी आवश्यक असणारे सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी फवारणी यंत्र, हायपोक्लाराईड, सॅनिटायझर तसेच हॉट वॉटरचे मशीन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.