Maval News: महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महिलांचा निषेध मोर्चा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका भारतीय जनता महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. 
महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या  मावळच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिला अत्याचाराला प्रतिबंध लागावा,राज्यातील महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे आणि बलात्काराच्या गुन्ह्यासंबंधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीची राज्यात कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मावळ तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे मावळचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.तसेच कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.राज्य महिला आयोग आणि बालहक्क आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सायली बोत्रे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले, पुणे जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा श्रीया रहाळकर, कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव, कल्याणी ठाकर, वैशाली ढोरे, स्मिता म्हस्के, अनिता सावले, माजी सभापती सुवर्णा कुंभार,नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेविका बिंद्रा गणात्रा, नगरसेविका सुनीता भिलारे, तळेगाव महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी भेगडे, लोणावळा महिला आघाडी अध्यक्ष योगिता कोकरे, वडगाव शहराध्यक्ष धनश्री भोंडवे, रोहिणी गाडे, कल्याणी राक्षे, आश्विनी साठे, रचना विधाटे, स्नेहल घोटकुले, प्रगती भेगडे, वंदना सोरटे, परिजा भिलारे, आशा गाडे, सुजाता पडवळ, रंजना भोईर तसेच उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिन्द्र केदारी, संघटन मंत्री किरण राक्षे, शेखर दळवी, अमोल धिडे, दत्तात्रय गाडे, गणेश कल्हाटकर, नामदेव भसे, विठ्ठल तुर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.