Maval : मावळात अवैध दारूविक्री करणाऱ्या तीन हॉटेलांना पोलिसांचा दणका; विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : 31 डिसेंबरच्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा उप विभागाच्या (Maval) वतीने अवैध व्यवसाय करणारे व्यवसायिक यांच्यावर धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने लोणावळा उप विभाग कार्यालयात स्वतंत्र डीबी पथक स्थापन करण्यात आले असून हे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करत आहे.

वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही हॉटेल व धाबे याठिकाणी विना परवाना अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 27 डिसेंबर रोजी शिवणे व मळवंडी ढोरे येथील हॉटेल जगदंब, हॉटेल पाटीलवाडा मटण खानावळ व हॉटेल कैलास चायनीज याठिकाणी छापे मारले असता तिन्ही ठिकाणी विना परवाना अवैध दारू विक्री सुरू असल्याचे दिसून आल्याने त्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 19 हजार 815 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

PCMC : क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करण्याची महेश लांडगे यांची मागणी

याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे विविध (Maval) कलमान्वये तीन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस नाईक रईस मुलानी व वडगाव मावळ स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.