Pune : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

17 ठिकाणी पार्किंगची सोय

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा जवळ पेरणे फाटा (Pune) येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड शहराकडून, नगर रोडवरुन अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी (पेरणेफाटा विजयस्तंभाकडे जाणारी वाहने वगळून) 31 डिसेंबर रोजी दुपारी दोन पासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

Maval : मावळात अवैध दारूविक्री करणाऱ्या तीन हॉटेलांना पोलिसांचा दणका; विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेवून मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेवून पुर्ण सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)

सोलापूर रोडवरुन आळंदी, चाकण याभागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेवून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक वडगाव (Pune) मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर हायवेने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)

इंद्रायणी नदीवरील आळंदी तुळापूर हा पुल 10 जानेवारी 2022 रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर रोडचा वापर करावा.

विश्रांतवाडी लोहगाव मार्गे वाघोली व वाघोली लोहगाव मार्गे विश्रांतवाडीकडे जाणारी जड वाहतूक 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान बंद करण्यात येत आहे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची बाहने वगळून)

विजयस्तंभास अभिवादनासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ –

(पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभा पर्यंत पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे.)

पुणे शहराकडून येणा-या वाहनांसाठी पार्किंग –

 

  • लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 1 – दुचाकी पार्किंग
  • लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 2 – चारचाकी पार्किंग
  • लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी पार्किंग क्र. 3 – चारचाकी पार्किंग
  • लोणीकंद आपले घर सोसायटीचे मागील पार्किंग क्र. 4 – खासगी बस व मोठी वाहने
  • लोणीकंद मोनिका हॉटेल शेजारील पार्किंग क्र. 5 – दुचाकी पार्किंग
  • हॉटेल ओम साई लॉजच्या पाठीमागील पार्किंग क्र. 6 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर फाटा स्टफ कंपनी शेजारी पार्किंग क्र. 7 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर फाटा राजशाही मिसळ हॉटेल मागे पार्किंग क्र. 8 – दुचाकी पार्किंग

 

एक जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सोमेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग एकेरी राहिल (पीएमपीएमएल बस वगळून)

आळंदीकडून येणा-या वाहनांसाठी पार्किंग –

 

  • तुळापुर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग क्र. 9 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल शेतकरी मिसळ शेजारील पार्किंग क्र. 10 – दुचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल रॉयल लॉजचे शेजारी पार्किंग क्र. 11 – दुचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल चिंचवन समोर रॉयल लॉजमागे पार्किंग क्र. 12 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड फुलगाव सैनिकी शाळा मैदान पार्किंग क्र. 13 – चारचाकी पार्किंग
  • थेऊर / सोलापूर कडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग –
  • सोमवंशी अॅकॅडमी समोर थेऊर रोड पार्किंग क्र. 14 – चारचाकी पार्किंग
  • थेऊर रोड, खंडोबाचा माळ वेअर हाऊस शेजारी पार्किंग क्र 15 – चारचाकी पार्किंग
  • थेऊर रोड खंडोबा माळ पार्किंग क्र. 16 – दुचाकी पार्किंग
  • अष्टापुर डोंगरगावच्या दिशेने येणा-या वाहनांसाठी पार्किंग –
  • पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोरील मोकळे मैदान पार्किंग क्र. 17 – दुचाकी/चारचाकी पार्किंग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.