Chinchwad : चहाच्या बिलावरून तरुणाला दगडाने मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज – चहाच्या बिलावरून झालेल्या भांडणात मित्रानेच (Chinchwad) एका तरुणाला दगडाने मारहाण केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी गौस सय्यद शेख (वय 24 वाल्हेकर वाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मानतेश उत्तम याळगी (वय 20 रा बिजलीनगर) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार अल्ताफ शेख कमल चांडालिया व मुट्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या ओळखीचे असलेले आरोपींसोबत चहा पिण्यासाठी आकुर्डी स्टेशन जवळ आले होते. यावेळी चहा पिल्यानंतर चहाच्या बीलावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र फिर्यादी ते भांडण तेथे सोडून घराकडे जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकी वर आले व त्यांनी फिर्यादीला मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच अल्ताफ याने रस्त्यावर पडलेला टोकदार दगड घेऊन फिर्यादीला मारून त्यांना गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, दमदाटी करून ते पळून गेले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.