Maval : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे दारू (Maval) विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 18 हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जांबवडे येथे करण्यात आली.

कैलास बलवंत भांगरे (वय 45, रा. जांबवडेगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कोकणे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : चहाच्या बिलावरून तरुणाला दगडाने मारहाण, एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास याने त्याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची 70 लिटर दारू आणि 53 दारूच्या बाटल्या विक्रीसाठी जवळ बाळगल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाने कैलास याच्यावर कारवाई (Maval) करत तयार देशी दारू, दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.