Maval : आमदार शेळके यांच्या समाजसेवेचा वसा घेत नागरिक राबवताहेत सामाजिक उपक्रम

‌‌एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांच्या (Maval) समाजसेवेचा वसा तालुक्यातील नागरिकांनी घेतला आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिसानिमित्त वराळे गावातील आदिवासी, कातकरी, ठाकर, वडार समाज बांधवांसाठी लोकसहभागातून स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन रविवारी (दि. 9) स्थानिक महिलांच्या हस्ते संपन्न झाले.
‌‌यावेळी माजी सरपंच विश्वनाथ आबा मराठे, माजी उपसरपंच बाळासाहेब दशरथ मराठे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी शंकर मराठे, ज्येष्ठ नागरिक काळुराम घोंगे, उद्योजक बाळासाहेब मराठे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ मराठे पाटील, निलेश मराठे, निलेश दत्तू मराठे, गणेश मच्छिंद्र मराठे, विकास सुदाम मराठे, रामदास मांडेकर, विवेक शिंदे, अतुल शिवाजी मराठे, अमर मराठे पाटील, सचिन चिलाजी मराठे सुदर्शन तरूण मंडळांचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
‌‌आमदार सुनिल शेळके नेहमीच समाज कार्यात अग्रेसर (Maval) असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वराळे येथील नागरिकांनी आमदार शेळके यांच्या कार्याचा आदर्श घेत गावातील वाडी- वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नये, यासाठी येथील नागरिकांनी लोकसहभागातून स्वच्छतागृह उभारणीचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.