Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील फ्लेक्स अज्ञातांनी फाडला, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेरील फ्लेक्स अज्ञाताकडून फाडण्यात आला असून, सदर प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून थंडीच्या पार्श्वभूमीवर घरेलू काम करणाऱ्या महिला आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत स्वेटर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात शनिवारपासून नाव नोंदणी करण्यात येत असून, त्यासंबंधी माहितीसाठी फ्लेक्स लावण्यात आला आहे.
सदर फ्लेक्स रविवारी अज्ञातांकडून फाडण्यात (Chandrakant Patil) आला असून, त्यासंदर्भात कोथरूडमधील अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.