Maval : कंपनी मॅनेजर हल्ला प्रकरणातील आरोपींचा आठवड्यानंतरही पोलिसांना सुगावा लागेना

दरम्यान, कंपनीकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. : The accused in the company manager assault case did not have a clue to the police even after a week

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसीमधील डाॅन्गशिन कंपनीतील एका मॅनेजरवर दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील विशाल लॉन्स समोर घडली. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. वडगाव पोलिसांना अजूनही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

मुथन्ना के. सुबय्या ( वय 57, रा. टाटा हाऊसिंग सोसायटी, वडगाव मावळ) असे हल्ला झालेल्या मॅनेजरचे नाव आहे.

या बाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुबय्या काम करत असलेली कंपनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे तळेगाव एमआयडीसी पोलीस देखील वडगाव पोलिसांना तपासासाठी मदत करीत आहेत.

सुबय्या हे तळेगाव एमआयडीसी परीसरातील डाॅन्गशिन कंपनीत मागील दोन महिन्यांपासून मॅनेजर पदावर रुजू झाले होते. त्या कालावधीत त्यांचे कंपनीतील कामगार, अधिकारी किंवा अन्य लोकांशी भांडण झाले आहे का तसेच अन्य बाबींची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, कंपनीकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे प्रकरण ?

सुबय्या हे 30 जुलै रोजी संध्याकाळी त्यांच्या कारमधून कंपनीतून घरी चालले होते. विशाल लॉन्स समोर त्यांच्या कारला एका मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे काय झाले, हे पाहण्यासाठी ते कार थांबवून बाहेर येत असताना मोटारसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पायावर हॉकीस्टिकने हल्ला केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सुबय्या यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. मात्र, या घटनेनंतर हल्लेखोर अद्यापही फरार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.