Rahul Gandhi on Ram Mandir : राम म्हणजे प्रेम, राम म्हणजे न्याय – राहुल गांधी यांचं ट्विट

राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. : Ram means love, Ram means justice - Rahul Gandhi's tweet

एमपीसी न्यूज – ‘मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम उत्तम मानवी गुणांचे प्रकटीकरण आहेत. आमच्या मनाच्या खोलवर रुजलेलं मानवतेचे मूळ म्हणजे राम’ अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणाले, राम प्रेम आहे. ते कधीही द्वेषात दिसू शकत नाहीत. राम करुणा आहे. ते कधीच क्रौर्यात दिसू शकत नाही. राम न्याय आहे. ते कधीही अन्यायात दिसू शकत नाहीत, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

तत्पूर्वी काल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यांनी एकूण नऊ शिळांचं पूजन केलं.

यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती.याच शिळेवर रामलल्ला विराजमान होणार आहेत.

भूमीपूजनाच्या सोहळ्याला काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते.

यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते.

पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.