Pune : पन्नास लाखांची बांबुची साडेचार हजार रोपे लागवडीविना पडून : दीपाली धुमाळ

खबरदारी म्हणून तातडीने योग्य ती कार्यवाही करुन रोपांची लागवड करण्याचे आदेश द्यावेत ; Fifty lakh bamboo saplings fall without planting: Deepali Dhumal

एमपीसी न्यूज – वडगाव शेरीत मुळा- मुठा नदीकाठावर लावण्यासाठी आणलेली पन्नास लाख रुपयांची बांबुची साडेचार हजार रोपे लागवडीविना महापालिकेच्या पाषाण रोपवाटीकेत पडून आहेत. या रोपांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने भर पावसाळ्यात ती सुकुन चालली आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने योग्य ती कार्यवाही करुन रोपांची लागवड करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

याबाबत धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) निवेदनाद्वारे केली आहे. पावसाची सुरुवात झाली नसल्यामुळे रोपांची लागवड करता येत नसल्याबाबतची माहिती मिळाली आहे. मात्र, लागवडीसाठी उद्यान विभागाकडे पैसे नसल्याने रोपे सुकुन जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

उद्यान विभागाकडून ही रोपे खरेदी करण्यात आली होती. पाषाण येथील रोपवाटीकेत ती ठेवण्यात आली आहेत. परंतु, वीज नसल्यामुळे व पुरेस पाणी मिळत नसल्याने ती रोपे पिवळी पडून खराब होण्याच्या मार्गावर आहेत. ही रोपे 50  लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली आहेत.

मात्र, प्रशासनच्या निष्काळजी वृत्तीमुळे पुणे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे संबंधीत अधिका-यांवर कडक कायदेशीर कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा लेखी तपशील आमच्या कार्यालयाकडे सादर करावा, असेही दीपाली धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांनाही याबतचे निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.