Maval : वासुदेव-पिंगळा यांच्या हाळीने आली बारणे यांच्या प्रचारात रंगत..!

एमपीसी न्यूज- शिवसेनेचे पिंपरी विभाग प्रमुख अनिल पारचा यांनी आज, सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून गजबजणा-या पिंपरीत शिवसेनेच्या प्रचारात वासुदेवाला आणून रंगत आणली.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. महाराष्ट्राच्या लोकजीवनाची व ग्रामीण संस्कृतीची बीजे वासुदेव, पिंगळा या लोकशिक्षण देणा-या मंडळींनी जिवंत ठेवली आहे.

आज पहाटेच्या सुमारास वासुदेवांनी शिवसेनेचे उपरणे गळयात वेढलेल्या वेषात पिंपरी कॅम्प परिसर पिंजून काढला. व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, फूल व्यापारी यांना प्रचार पत्रक वाटत पहाटेची गीते गात अनोख्या पध्दतीने प्रचार केला. विभाग प्रमुख अनिल पारचा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.