Maval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वडगाव मावळ, कामशेत या प्रमुख शहरांसह पुणे-मुंबई महामार्गालगतच्या गावांमध्ये प्रचारफेरी काढून मतदारांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून सुनीलआण्णांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वडगाव येथे आज (गुरुवार) आठवडा बाजार होता. सुनीलआण्णांनी आठवडे बाजारात फेरफटका मारत शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधला. वडगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रचारफेरीत जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, तुकाराम ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे, हेमांगी ढोरे, मीनाक्षी ढोरे, प्रमिला बाफना तसेच मंगेशकाका ढोरे, गंगाराम ढोरे, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, भाऊ ढोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, मोहितेवाडी, साते,कान्हे, अहिरवडे, नायगाव, कामशेत, कुसगाव, येवलेवाडी, चिखलसे, पाथरगाव या गावांनाही शेळके यांनी भेट दिली. जांभूळमध्ये उपसरपंच अंकुश काकरे तसेच अमोल जांभूळकर,अरुण जांभूळकर, श्रीपाद पोटवडे, सुरेश नवघणे, विकास जांभूळकर, रमेश गाडे, सुनील जांभूळकर, तृप्ती जांभूळकर, सीमा जांभूळकर, उर्मिला जांभूळकर, चंद्रभागा जांभूळकर यांनी तर ब्राह्मणवाडी येथे सरपंच रामभाऊ शिंदे, उपसरपंच नवनाथ शेळके तसेच विशाल नवघणे, राजू शिंदे, उमेश शिंदे, नीलेश शिंदे, वाघू नवघणे यांनी शेळके यांचे स्वागत केले.

बाबूराव वायकर म्हणाले की, गेली चार ते पाच वर्षे सुनीलअाण्णा महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. रुग्णांना सढळ हाताने मदत करीत आहेत. गावांतील मंदिराना व विकासकामांना भरीव मदत करीत आहे. ज्येष्ठांसाठी तर आधाराची काठी बनले आहेत. अशी अनेक प्रकारची समाजकार्ये अण्णांनी केली आहेत. वडगाव-खडकाळे जिल्हा परिषद गटात आपण जिल्हा परिषद फंडातून अनेक कामे केली, परंतु जनतेपुढे मांडायला आता मुद्दे नसल्याने सत्ताधारी पक्षांचे आमदार न केलेल्या कामाचे फलक लावून जनतेची फसवणूक करीत आहेत.

जनतेने आता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. आमच्याकडे कामे झाली, ती राष्ट्रवादीने केली. भाजपाने आमच्याकडे कसलेही काम केले नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आमच्या गावातून जास्त मतदान देऊन भेट देणार आहोत, असे मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले.

कान्हे येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, सरपंच पूनम सातकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, सुनील अाण्णा शेळके युवा मंच, महिला बचत गट, भैरवनाथ मित्र मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, ॐ साई मित्र मंडळ, धम्मदीप मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, शिवप्रसाद मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ आदींनी शेळके यांना पाठिंबा दिला.

कान्हे गावच्या सरपंच पूनम सातकर म्हणाल्या की, कान्हे गावाला राजकीय वारसा आहे. विरोधकांनी सुनील शेळके यांना महाभारतातील कर्णाची उपमा दिली त्यामुळे कर्णाप्रमाणे सुनील शेळकेही दानत असलेला माणूस आहे हे विरोधकांनी मान्य केले आहे.

अहिरवडे गावचा 40 वर्षे रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूर्ण केला तसेच रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी दिला आम्ही आमच्या गावच्या भविष्यासाठी सुनील शेळके यांना आमच्या गावातून बहुमत देणार, असे अहिरवडे येथील रहिवाशांनी सांगितले.

कामशेतमध्ये सुनील शेळके यांच्या प्रचारादरम्यान कामशेत ग्रामस्थांनी बाजारपेठेतून भव्य पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान व्यापारी समाजातील अनेक बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन आण्णांचे स्वागत केले. कामशेत येथील चित्तोडीया समाजानेही सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला.

चिखलसे येथे गणेश काजळे, बाळासाहेब काजळे, विजय काजळे, कैलास काजळे, अनिल सातकर , नीलेश काजळे, तुकाराम काजळे, गणेश मधुकर काजळे आदींनी शेळके यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like