Pimpri : महापौर जाधव यांची ‘वायसीएमएच्’ला अचानक भेट; प्रसुती कक्षाची केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्) रुग्णालयाला महापौर राहुल जाधव यांनी अचानक भेट दिली. प्रसुती कक्षाची पाहणी केली. तसेच प्रसूत महिलांना सर्व सोयी सुविधा देण्याचे आदेश त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिले आहेत. 

महापौर जाधव यांनी आज (शुक्रवारी) दुपारी अडीचच्या सुमारास वायसीएमएच् रुग्णालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, ‘इ’ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेविका नम्रता लोंढे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारिका लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमएचचे वैद्यकीय आधीक्षक डॉ. मनोज देशमुख उपस्थित होते.

महापौर जाधव यांनी तळमजल्यावर असलेल्या प्रसुती कक्षाची पाहणी केली. प्रसूत झालेल्या महिलांना मुबलक प्रमाणात सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.