Pune : मोलकरणीनेच केला हाथ साफ; तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरकाम करणाऱ्या एका महिलेने काम सोडल्यानंतर बनवून घेतलेल्या बनावट चवीचा वापर करून 7 लाख 75 हजारांचा ऐवज चोरी करून नेला.  

ही घटना जून 2018 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान संजय दोडेजा (वय 55, रा. शंकरशेठ रोड,पुणे ) यांच्या घरी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय दोडेजा (वय 55, रा.पुणे) यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने काम सोडण्यापूर्वी फिर्यादीच्या घराच्या बनावट चाव्या बनवून घेतल्या होत्या. व त्यानंतर महिलेने काम सोडल्यानंतर घराचे कुलूप बनावट चवीच्या साहाय्याने उघडून घरात घुसून घरातील लाकडी कपाटाचे कुलूप उघडून त्यातील एकूण 7 लाख 75 हजार किंमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेले. घटनेचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.