Women molestation : महिलेचे नको ते व्हिडीओ काढून विनयभंग करणाऱ्यास अटक 

एमपीसी न्यूज : महिलेच्या बाथरूमच्या खिडकी बाहेर मोबाईल फोन ठेवून नको ते व्हिडीओ काढून विनयभंग करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे.(Women molestation) ही घटना काल बुधवारी 16 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथे घडली आहे.याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

आरोपी नितीन शिंदे, वय 19 वर्षे, रा. नेहरूनगर, पिंपरी याला अटक करण्यात आले आहे. आरोपी शिंदे विरोधात भा.द.वि कलम 354, 354(क), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thergaon Hospital : महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात पोटाच्या आताड्याची यशस्वी शस्त्रक्रिया

फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घराच्या बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेल्या असता आरोपी शिंदेने बाथरूमच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूने मोबाईल फोन ठेवून मोबाईल मधून चोरून व्हिडीओ काढले. त्यामुळे फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होऊन फिर्यादीचा विनयभंग केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.