Milk society award : श्री जखनीमाता दूध संस्थेला आर्दश दुध संस्थेचा पुरस्कार

एमपीसी न्यूज : वेल्हे तालुक्यातील अंत्रोली या गावातील श्री जखनीमाता सहकारी संस्थेचा पुरस्कार दुध उत्पादक संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या.( Milk society award) कात्रज, पुणे. या संस्थेने सन 2021/2022 कालावधीसाठी आर्दश सहकारी दुध उत्पादक संस्था म्हणून या संस्थेला सन्मान चिन्ह व स्वच्छ दुध उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने 11,000/-रोख रक्कम,शाल,श्री फळ देऊन गौरवण्यात आले.

पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कात्रज, पुणे या संस्थेच्या 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये आर्दश दुध संस्था म्हणून श्री जखनीमाता सहकारी दुध उत्पादक संस्थेला हा पुरस्कार पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कात्रज, पुणे. या संस्थेच्या अध्यक्षा केसराताई पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व वेल्हे तालुक्यातील कार्यक्षम विद्यमान संचालक भगवानराव पासलकर यांच्या हस्ते या संस्थेचे चेअरमन रघुनाथ राऊत यांनी हा सन्मान स्विकारला.

Shivsena Melava : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भाषणास सुरूवात..

या प्रसंगी वेल्हे तालुका, पोलिस पाटील शिवाजी राऊत, ज्येष्ठ पत्रकार शांताराम ठाकर, वेल्हे तालुक्यातील विविध सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन नानासाहेब देशमुख, चिंतामण पोळेकर, तानाजी पासलकर, रामभाऊ साष्टे, माऊली तिडके, संजय दारवटकर, सखाराम निम्हण, पांडूरंग पासलकर, (Milk society award) अनंता खाटपे, विनायक पायगुडे, माणिक पासलकर, शोभाताई पासलकर, मारूती भिकुले, श्री जखनीमाता सहकारी दुध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी गोविंद राऊत, दिनकर राऊत, नारायण काकडे, संग्राम राऊत, विनायक राऊत, समीर राऊत, विक्रम दारवटकर, सागर राऊत आदी सभासद उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.