Pimpri News : नगरसेवकांचे नामफलक तत्काळ काढा; ‘एमआयएम’ची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून आठ दिवस होत आले. तरी, नगरसेवकांचे नामफलक, संपर्क कार्यालय, निवासस्थान असे दर्शविलेले दिशादर्शक फलक काढले नाहीत. हे फलक तत्काळ काढावेत अशी मागणी ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यात साळवे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व नगरसेवक यांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर प्रशासक यांच्या मार्फत महापालिकेचे कामकाज सुरू झाले आहे. शहरातील महापौर, उपमहापौर, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक यांचे नामफलक व संपर्क कार्यालय, निवासस्थानाकडे असे दिर्शदर्शक फलक काढून टाकणे गरजेचे आहे.

महापौर, उपमहापौर, नगरसेवक व महापालिका अंतर्गत असलेले विविध समिती सदस्य यांचा कार्यकाळ संपून अनेक कालावधी उलटून जातो .परंतु, या सन्माननीय व्यक्तींच्या नावाने असणारे नामफलक,दिशादर्शक फलक हे वर्षानुवर्षे तसेच राहतात त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर वाढतेच आहे. परंतु, सामान्य नागरिकांत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे नगरसेवकांचे शहरातील नामफलक, दिशादर्शक फलक, अनाधिकृतरित्या बसवलेले फलक हे तत्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.