Pune Crime News : मोक्का व घरफोडी गुन्हयातील आरोपीला अटक ,गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई 

एमपीसी न्यूज – मोक्का व घरफोडी गुन्हयातील तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा, युनिट दोनने शुक्रवारी (दि.4) ही कारवाई केली. 

गुंडया ऊर्फ नरेंद्र सरपाटे (रा. आकुर्डी, पुणे), लक्कीसिंग गब्बरसिंग टाक (रा. आनंदनगर, रामटेकडी, पुणे) व शंकरसिंग अवतारसिंग जुनी (रा. जुनी म्हाडा वसाहत, हडपसर, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी 4 जून रोजी केलेल्या कोंबीग ऑपरेशन दरम्यान, अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली. यावेळी निगडी पोलीस ठाणेकडील मोक्क्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी नरेंद्र सरपाटे नायडू हॉस्पीटल जवळ मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

दुस-या कारवाईत पोलिसांनी रामटेकटी झोपडपट्टी, पुणे येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना अधिक चौकशी करता सहकारनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीअंती आरोपी हे घर फोडीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पण्ण झाले असून, पुढील कारवाईकामी सहकारनगर पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.