Cantonment Board Unlock Order : खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पुणे महापालिका तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे आदेश लागू

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी आपापल्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रासाठी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यात खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पुणे महापालिकेचे तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार असल्याचे म्हटले आहे.

 

पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू होणारे पुणे महापालिकेचे आदेश खालीलप्रमाणे –

# हॉटेल, रेस्टोरंट ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने

# हॉटेल मधून शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा

# लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी

# सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत

# खासगी कार्यालये ( सोमवार ते शनिवार ) – दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)

# क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात

# चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत

# सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत

# लग्न – 50 जणांच्या उपस्थितीत

# अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत

# शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती

# बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा

# शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत

# शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

# जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन

# सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून

# ई कॉमर्स – नियमित वेळेत

# मला वाहतूक – नियमित वेळेत

# अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर, – नियमित वेळेत

———

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे लागू होणार आदेश खालीलप्रमाणे –

अत्यावश्यक सेवा (Essential Category) मध्ये खालील सेवांचा समावेश असेल.
# रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लीनिक्स, लसीकरण ( Vaccination), वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज, फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणा-या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा
# पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने
# वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित कामे
# विमानसेवा व त्याच्याशी संबंधित सेवा
# किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने,
# शीतगृह आणि गोदाम सेवा
# सार्वजनिक वाहतूक टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा, सार्वजनिक बस
# वेगवेगळ्या देशांचे राजदूत यांची कार्यालये
# पूर्व पावसाळी नियोजित कामे
# स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणा-या सार्वजनिक सेवा,
# रिजव्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणीन घोषित केलेल्या सेवा
# सेबी तसेच संबीची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये
# दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा.
# मालवाहतूक
# पाणीपुरवठा सेवा
# कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा)
# सर्व प्रकारचे आयात निर्यात
# ई-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी)
# मान्यताप्राप्त मिडिया
# पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणा-या सेवा
# सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा
# डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिसेस / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा,
# शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.
# विद्युत व गॅस वितरण सेवा,
# एटीएम
# पोस्टल सेवा,
# बंदरे व त्यासंबंधित उपक्रम
# कस्टम हाऊस एजेंट, लस / औषधे / जीवन रक्षक औषधांची संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
# कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणा-या / पुरवठा करणा-या सेवा.
# पावसाळ्याच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणा-या सेवा.
# आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित अत्यावश्यक सेवा.

सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील कार्यालये सुरु राहतील,
# केंद्र, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये
# को ऑपरेटीव्ह बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका
# अत्यावश्यक सेवा पुरवठा करणा-या कंपन्यांची कार्यालये
# विमा / मेडीक्रेम कंपनी
# औषध उत्पादन करणा-या आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्यांच्याशी संबंधित कार्यालये
# रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था ( Standalone Primary dealers, CCIL NPCI पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि रिझर्व बँकने नियमित केलेल्या बाजार पेठेतील कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागीसह घातक व मध्यस्थी
# सर्व नॉन – बैंकिंग वित्तीय महामंडळ.
# सर्व मायक्रो फायनान्स संस्था
# वकील. सी. ए. यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये,

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील,

# अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

# मॉल, सिनेमागृह (Single screen and multiplex) नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.

# रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी चार नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. ( प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे बंद राहील).

# सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट यांना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि 50 टक्के प्रमाणे परवानगी असलेली आसन क्षमता यांचा बोर्ड लावणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे स्टीकर्स लावणे. बंधनकारक असेल.

# लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचा-यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने) खुली मैदाने चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील.

# सूट देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

# शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयांव्यतिरिक्त) 50 टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

# उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची परवानगी घ्यावी.

# सर्व आउटडोअर स्पोर्ट सर्व दिवशी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सुरू राहतील

#  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात जेथे चित्रीकरणाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चित्रीकरण ( Shooting) करण्यास परवानगी राहील. चित्रिकरणाशी संबंधित कर्मचा-यांना जवळच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्यास (Dedicated Colony ) तसेच त्या ठिकाणाहून स्वतंत्र वाहनाने ने आण करण्याची व्यवस्था असल्यास चित्रीकरण करण्यास परवानगी असेल. मात्र सायंकाळी पाच नंतर चित्रीकरणाच्या ठिकाणाहून बाहेर प्रवास करता येणार नाही.

# सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी राहील.

# लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

# अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

# विविध बैठका, सभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा, निवडणुका या 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे. असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास तसे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी चार वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

# कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना बी बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील.

# ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध राहील.

# सायंकाळी पाच नंतर कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.

# व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (by appointment) दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकुलन (AC) सुविधा वापरता येणार नाही.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने (without standing) सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेशी निगडीत व्यक्तींनाच त्यातून प्रवास करता येईल

# माल वाहतूक करणा-या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्ती (चालक + क्लीनर / मदतनीस) यांनाइतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.

# खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहनाने शासनाने घोषित केलेल्या लेवल पाच मधील ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-pass आवश्यक राहील.

# निर्यातपूर्वक उद्योग / Export oriented units (including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.

खालील उत्पादन क्षेत्र उद्योग नियमितपणे सुरु राहतील.

# अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग (अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह).

# सतत प्रक्रिया करणारे उद्योग

# राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग उपरोक्त उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण करण्यासाइ संबंधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी. सदर कर्मचा-यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.

# उपरोक्त आदेशामध्ये परवानगी देण्यात आलेल्या ज्या आस्थापना दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच त्या ठिकाणावरुन सेवा घेणारे नागरिक यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे घरी पोहचणे अपेक्षित आहे.

# पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक 30 जून 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

# इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे.

# परीक्षेशी संबंधित सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीरकण केलेले असावे. अथवा 48 तास वैधता असणारे कोविड 19 निगेटिव्ह (RTPCR / RAT / TruNAT / CBNAAT) सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

# महाराष्ट्राबाहेरील बोर्ड / विद्यापीठ / प्राधिकरण यांच्या परीक्षा घेणे अत्यावश्यक असल्यास संबंधित विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संमतीने परवानगी द्यावी.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना / परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षेकरीता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत / परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत संचारबंदीच्या काळात प्रवास करणेस परवानगी राहील. परीक्षार्थी सोबत एक पालक यांना देखील प्रवास करणेस परवानगी राहील. मात्र परीक्षार्थाना प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल तिकिट बाळगणे अनिवार्य आहे.

# सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

# सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीरकण करून घ्यावे

# मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार घरपोच सुविधा (Home Delivery ) सुरु राहील.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील बाजारपेठांमध्ये एक दिवसाआड ( Alternate day ) सम विषम पद्धतीने रोज 50 टक्के दुकानांना चालू ठेवण्यासाठी किंवा लोकहिताच्या दृष्टीने स्थानिक परिस्थितीप्रमाणे त्याहून जास्त बंधने ( Restrictions ) लावण्यासाठी संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

# सर्व दुकानमालक, कामगार व इतर व्यक्तीची रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) प्रत्येक पंधरा दिवसांनी करण्यात येईल. स्थानिक क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय विभागाच्या मदतीने याची अंमलबजावणी करावी.

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, विक्रेते, व्यापारी, कामगार इत्यादी सर्व लोकांनी मास्क न वापरल्यास किंवा कोविड 19 प्रोटोकॉल विरोधी वर्तन केल्यास ( उदा. थुंकणे, योग्य अंतर न पाळणे इत्यादी) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येकी 10 भरारी पथके नेमली आहेत. पोलिसही या कारवाईत भाग घेतील.

# हे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 सरासरी पॉझिटिव्हीटी दर व ऑक्सिजन बेड ऑक्यूपेन्सी यांच्या टक्केवारीनुसार शासनाने निश्चित केलेल्या लेव्हल विचारात घेऊन निर्गमित केलेले आहेत. जर त्यामध्ये वाढ / कमी झाल्याचे आढळून आल्यास याबाबत आढावा घेऊन सुधारित आदेश निर्गमित केले जातील.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.