Pune Rural Unlock News : पुणे ग्रामीण परिसरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी;अन्य दुकानांना अद्याप परवानगी नाही

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण परिसरातील अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकानांना दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अन्य दुकाने सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 12.6 टक्के आहे. तर ऑक्सिजन बेड ओक्युपेन्सी 31.57 टक्के आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण परिसर निर्बंधस्तर चार मध्ये येत आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंधांची नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सोमवार (दि. 7) पासून लागू होणार आहे.

नवीन नियमावलीनुसार काय सुरू काय बंद

# अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकाने व आस्थापना सर्व दिवशी दुपारी चार पर्यंत सुरू राहतील

# इतर दुकाने बंद राहतील

# मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहतील

# रेस्टॉरंट, हॉटेल, उपहारगृहे, खानावळी, शिव भोजन थाळी या सेवा फक्त पार्सल, होम डिलिव्हरी स्वरूपात सुरू राहतील.

# वैद्यकीय आणि काही अत्यावश्यक सेवा करिता लोकल ट्रेन सुरु राहतील

# सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे आणि सायकलिंगसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते सकाळी नऊ सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी बंद राहतील.

सूट देण्यात आलेल्या आस्थापना
# केंद्रीय राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली सर्व संविधानिक प्राधिकरणे व संस्था
# सहकारी सार्वजनिक आणि खाजगी बँका, सार्वजनिक उपक्रम
# अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये
# विमा आणि मेडीक्लेम कार्यालये
# औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांचे कार्यालये, जी उत्पादनाच्या वितरणाची संबंधित व्यवस्थापनाशी निगडित आहेत
# रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत नियंत्रित स्वतंत्र कार्यकक्षा असलेले प्राथमिक वितरक सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टिम ऑपरेटर्स आणि आरबीआयकडून नियंत्रित बाजारांमध्ये समाविष्ट असलेले सर्व आर्थिक बाजार
# सर्व नाॅन बँकिंग, वित्तीय महामंडळे
# सर्व मायक्रो फायनान्स संस्था, न्यायालय, लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरू असल्यास त्यांच्याशी संबंधित सर्व अधिवक्ता, वकील यांची कार्यालये सुरू राहतील.

# 25% अधिकारी-कर्मचार्‍यांच्या उपस्थित कार्यालय सुरू राहतील

# मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

# गर्दी नसणारे चित्रीकरण करण्यास सोमवार ते शुक्रवार परवानगी राहील. सायंकाळी पाच वाजल्यानंतर बाहेर प्रवास, संचार करता येणार नाही. दर शनिवार आणि रविवार बाहेर कोणताही संचार, प्रवास करता येणार नाही.

# सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे बंद राहतील.

# जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडता येते

# अंत्ययात्रा, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांची परवानगी आहे.

# बैठका, निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह घेता येतील.

# ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशी बांधकामे सुरू राहतील.

# कृषी व कृषिपूरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू राहतील

# ई-कॉमर्स वस्तू व सेवा – फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या ई-कॉमर्स सेवा सुरू राहतील.

# सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.

# व्यायाम शाळा केशकर्तनालय दुकाने ब्युटी पार्लर्स वेलनेस सेंटर – सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सदर ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पूर्वनियोजित वेळ ठरवुनच प्रवेश देण्यात येईल. तसेच एसी चा वापर करण्यास मनाई राहील. सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाईल.

# सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमते सहज सुरू राहील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

# कार्गो सेवा मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्ती नियमितपणे सुरू राहील

# खाजगी वाहने टॅक्सी बसेस लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहील. परंतु या वाहनांमधून मर्यादित निर्बंधस्तर 5 मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवासी थांब्यावर उतरणार असल्यास त्या प्रवाशांना ई- पास बंधनकारक असेल.

# उत्पादक घटक – निर्यात याविषयी संबंधित घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याचे आवश्यक असलेल्या एमएसएमई सह पन्नास टक्के कर्मचारी क्षमतासह, सदर कामगार बाहेरून प्रवास करून येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करण्याच्या अटीवर सुरू राहील.

# उत्पादन घटक –
अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक
सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग
राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंची उत्पादन घटक
डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी सर्विसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा-सुविधांना आवश्यक असणारे घटक -पन्नास टक्के कर्मचारी क्षमते सह सुरू राहतील.सदर कामगार बाहेरून प्रवास करून येणार असल्यास त्यांच्या प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करण्याच्या अटीवर वरील अस्थापना सुरू राहतील.

# वरील उत्पादन घटकांचा व्यतिरिक्त अन्य आस्थापना पन्नास टक्के कर्मचारी क्षमते सह सुरू राहतील.
जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सर्व राहण्याची सोय असलेली किंवा कामाच्या ठिकाणी जवळच स्वतंत्र कॉलनी मध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी.
बाहेरून येणाऱ्या जास्तीत जास्त दहा टक्के व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्यासह परवानगी असेल.

# पुणे जिल्हा ग्रामीण कार्य क्षेत्राचा समावेश शासन अधिसूचनेत मर्यादित निर्बंधस्तर चार मध्ये असल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणार्‍या व्यक्ती किंवा सदर दुकानांमधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 5 नंतर हालचाल प्रवास करण्यास परवानगी असणार नाही.

# शासनाने देशातील सूचनांनुसार ज्या ज्या वेळी पासचे आवश्यकता आहे. त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तिक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासचे आवश्यकता असणार नाही.

# covid-19 चार व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणार्‍या अस्थापना शंभर टक्के उपस्थिती सह सुरू राहतील.

 अत्यावश्यक सेवा मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल –

रूग्णालय रोग निदान केंद्र क्लीनिक्स लसीकरण केंद्रे वैद्यकीय विमा कार्यालये औषध दुकाने औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा  यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक वाहतूक आणि पुरवठासाखळी यांचा समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चामाल, उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल.
शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा दवाखाने ॲनिमल केअर सेंटर व पेट फूड शॉप
# वनविभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज
# विमानचालन आणि संबंधित सेवा
# किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने, संस्था शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सूनपूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने,  छत्री दुरुस्ती करणारी दुकाने प्लास्टिक शीट ताडपत्री रेनकोट इत्यादी वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने
# शीतगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा
# सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – विमानसेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सार्वजनिक बसेस
# विविध देशाच्या परराष्ट्र संबंध विषय कार्यालयांच्या सेवा
ठाणे प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व कामे
# स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा
# रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
# सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडित पायाभूत संस्था, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कार्पोरेशन इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था
# दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, देखभाल विषयक बाबी
# मालाची वस्तूंची वाहतूक
# पाणी पुरवठा विषयक सेवा
# शेती संबंधित सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडित सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारी शेती पूरक सेवा. जसे की – बी-बियाणे, खते व उकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज
# सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात
# ई-कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल पुरवठ्याशी निगडीत
# मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे
# पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा
# सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
# डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, माहिती तंत्रज्ञान, महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवांशी संबंधित, वास्तुविशारद अस्थापना
# शासकीय आणि खाजगी सुरक्षाविषयक सेवा
# विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा
# एटीएम
# पोस्टल सेवा
# बंदरे आणि त्या अनुषंगिक सेवा
# कस्टम हाऊस एजंट, परवानाधारक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर औषधी, जीवरक्षक, औषधांशी संबंधित वाहतूक
# अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चामाल, पॅकेजिंग मटेरियल यांचे उत्पादन करणारे उद्योग
# पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तिक व संस्थांसाठी वस्तूंचे उत्पादन करणारे घटक सुरू राहतील
# स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हातवारे निश्चित केलेल्या इतर आवश्यक सेवा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.