Monginis Dealership : ‘मॉन्जिनीज’ची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचाइजी (Monginis Dealership) देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख रुपायांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

राजेश किरणचंद संघवी (वय 53, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9593203357 क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navratra Festival: नवरात्र महोत्सवानिमित्त स्पर्धा आणि बक्षिसांची लयलूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संघवी यांना  मॉन्जिनीज कंपनीचे केक शॉप (Monginis Dealership) सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली. त्यांनी 18001216986 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने संघवी यांना [email protected].in या ई-मेल आयडीवर अर्ज करण्यास सांगितले.

संघवी यांना तीन बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर 12 लाख 12 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल सामान, केकचे प्रकार पाठविण्यात येणार होते. मात्र आरोपींनी त्यांना केक शॉप संबंधित कोणतेही सामान न पाठवता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.