Talegaon News : तळेगाव दाभाडे येथे भाजी विक्रेत्या दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज – भाजी विक्रेत्या महिलेसोबत गैरवर्तन करत तिला व तिच्या पतीला शिवगाळ व मारहाण (Talegaon News) करण्यात आली आहे.  ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली.

आमिर आसिफ शेख (वय 19), अफसान आसिफ शेख (वय 20), एक महिला (तिघे रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या शिवाजी चौकात (Talegaon News) शुक्रवारी सकाळी भाजी विक्री करत असताना आरोपी आमिर तिथे आला. त्याने भाजीचे कॅरेट पायाने ढकलून देत फिर्यादीला शिवीगाळ केली.

Monginis Dealership : ‘मॉन्जिनीज’ची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

फिर्यादी यांचे पती आरोपीला समजावून सांगत असताना त्याने अन्य दोन आरोपींना बोलावून घेतले. त्यांनतर फिर्यादीच्या पतीला आरोपींनी मारहाण केली. फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.