Shivsena MLA : शिवसेनेचे 13 हून जास्त आमदार फुटणार?; अनेक जणांचा मोबाईल बंद

एमपीसी न्यूज – विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता ठाकरे सरकारला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्या 13 समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे.एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह (Shivsena MLA)    गुजरातमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

 

शिवसेनेचे आणखी काही आमदार शिंदे यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA)  फुटण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान दुपारी दोन वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परीषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

 

 

 

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत.काही वेळापुर्वीच बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत. हे दोघेही एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. संजय रायमुलकर यांनी काही वेळापुर्वीच व्हॅट्सअपवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. त्यामुळे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले आहे. त्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि आकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुखसुध्दा  नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 13 नव्हे तर जास्त आमदार जाऊ शकतात. याप्रकारे असेच घडल्यास शिवसेना खिळखिळी होईल त्यामुळे उध्दव ठाकरे कशी गळती रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Karuna Sharma Arrested : करुणा शर्मा यांना पुण्यात अटक

 

एकनाथ शिंदे यांच्या संपर्कातील आमदार

शहाजी बापू पाटील,  महेश शिंदे,  भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे,  उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे,  प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, सुहास कांदे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.