Karuna Sharma Arrested : करुणा शर्मा यांना पुण्यात अटक

एमपीसी न्यूज – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना अटक (Karuna Sharma Arrested) करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे. 

 

MPC News Podcast 21 June 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

 

एका महिलेचा पती व करुणा शर्मा  (Karuna Sharma Arrested) यांनी फिर्यादी महिला धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली होती आणि पतीसोबत घटस्फोट घ्यावा यासाठी ठार मारण्याची धमकी दिली होती.

महिलेने केलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आता करुणा शर्मा यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.